
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 20 नक्षलवाद्यांनी आत्मसर्मपण केले. यातील 11 नक्षलवाद्यांवर एकूण 33 लाख रुपयांचे बक्षीस होते. यात लिबरेशन गोरीला आर्मी बटालियन क्रमांक 1 च्या नक्षलवाद्यांचा तसेच 9 महिलांचा समावेश आहे.
कोलकात्यातून 300 दुर्गामातेच्या मूर्ती परदेशात
कोलकाता – तब्बल 300 हून अधिक दुर्गामातेच्या मूर्ती जहाजाद्वारे परदेशात पाठवण्यात आल्या. 2024 मध्ये हा आकडा 240 होता. भू-राजकीय परिस्थितीमुळे गेल्या वर्षी रशियाकडून मूर्ती मागवण्यात आल्या नाहीत. यंदा मात्र मोठी ऑर्डर देण्यात आली.
के. कविता यांचा आमदारकीचा राजीनामा
हैदराबाद – भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा के चंद्रशेखर राव यांनी मुलगी आमदार के. कविता यांना निलंबित केले. त्यानंतर आज के कविता यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. हरीश राव आणि संतोष राव यांच्यामुळे सीबीआयचा ससेमीरा वडिलांमागे लागल्याचा आरोप त्यांनी केला.
वैष्णोदेवी बेस कॅम्पवर रेकॉर्डब्रेक पाऊस
कटरा – माता वैष्णोदेवी बेस कॅम्पवर यंदा रेकॉर्डब्रेक पाऊस झाल्याचे समोर आले आहे. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे वैष्णोदेवी यात्रा आज नवव्या दिवशीही स्थगित ठेवण्यात आली. कटरा येथे तब्बल 200 मीमी पाऊस झाला.
छत्तीसगडमध्ये 18 ठिकाणी ईडीची छापेमारी
रायपूर – डिस्ट्रिक्ट मिनरल फाऊंडेशन ट्रस्टमधील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने आज रायपूर, दुर्ग, भिलई आणि विलासपूरसह तब्बल 18 ठिकाणी छापेमारी केली. कृषी क्षेत्राशी संबंधित उद्योजकांच्या घरांवर कार्यालयांवर धाडी टाकण्यात आल्या.