1 / 6
देशाचे अर्थमंत्री व भाजप नेते अरुण जेटली यांचे 24 ऑगस्ट 2019 रोजी निधन झाले. जेटली यांच्या निधनाने भाजपचे मोठे नुकसान झाले.
देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री व भाजप नेत्या सुषमा स्वराज यांचे 6 ऑगस्ट 2019 ला निधन झाले. तब्बल 42 वर्ष राजकारणात सक्रिय असलेल्या सुषमा स्वराज या सामान्य जनतेच्या लाडक्या नेत्या होत्या.
देशाचे माजी संरक्षण मंत्री व गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे 17 मार्च 2019 ला निधन झाले. त्यांच्या जाण्याने देशाने एक सच्चा नेता गमावला. पर्रिकर हे कर्करोगाने त्रस्त होते तरी त्यांनी अखेरपर्यंत गोवेकरांची सेवा केली.
माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे 29 जानेवारी 2019 ला निधन झाले. 1977 मध्ये आणीबाणी मागे घेण्यात आली आणि निवडणुका घेण्यात आल्या. तेव्हा तुरुंगात असतानाही मुझफ्फरपूरमधूनन 3 लाख मतांच्या फरकाने ते जिंकून आले.


























































