
दुबई येथे रविवारी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीत सुवर्णपदक जिंकले आहे. या सुवर्ण पदकाच्या कमाईमुळे या स्पर्धेतील हिंदुस्थानची 58 वर्षांची दीर्घ प्रतीक्षा संपली आहे. बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली दुहेरी जोडी बनून सात्विक-चिराग जोडीने इतिहास रचला. जागतिक क्रमवारीत 6 व्या क्रमांकावर असलेल्या या जोडीने 8व्या क्रमांकावर असलेल्या वन य्यू सिन आणि मलेशियाच्या तेओ ई यी या जोडीला शेख रशीद बिन हमदान इनडोअर हॉल, अल नसर क्लब येथे 3-गेमच्या अप्रतिम लढतीत पराभूत केले. सात्विक आणि चिराग यांनी 3 गेमच्या फायनलमध्ये जबरदस्त पुनरागमन केले. बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपमध्ये हिंदुस्थानचे हे पहिले पुरुष दुहेरी सुवर्णपदक आहे.
























































