2023 वर्ष ठरले सर्वाधिक उष्णतेचे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

 गेल्या वर्षी उष्णतेचे सर्व रेकॉर्ड तुटले आहेत. 2023 ची सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून नोंद झाली आहे. उष्णतेच्या लाटांचा परिणाम समुद्रापासून हिमनद्यांपर्यंत (ग्लेशियर) दिसून आलाय. यूएनच्या वर्ल्ड मीट्रियोलॉजिकल ऑर्गनायझेशनने (डब्ल्यूएमओ) मंगळवारी तापमानवाढीचा अहवाल जारी केला. डब्ल्यूएमओच्या अहवालानुसार, 2023 हे केवळ एक वर्ष नव्हे तर 2014 ते 2023 पर्यंतचे दशक भयंकर उष्णतेच्या तडाख्याचे राहिलेय.