अमरावतीत आढळले कोरोनाचे 21 रुग्ण, 5 रुग्णांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरावती जिल्ह्यात आज कोरोनाचे 21 रुग्ण सापडले आहेत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 5 हजार 355 वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण सुरू झाल्यानंतर प्रथमच अमरावती जिल्ह्यात शुक्रवारी विक्रमी 207 कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर आज पुन्हा 21 नवे रूग्ण आढळून आले आहे. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या 3हजार 355 झाली आहे. सध्या स्थितीत 889 रूग्ण अमरावतीच्या तर 17 रूग्ण नागपूरच्या कोविड रूग्णालयात भरती आहे. मृतकाची संख्या आता 127 झाली आहे.  आज आढळून आलेल्या 21 रूग्णापैकी 10 रूग्ण ग्रामीण भागातील असून उर्वरित 11 रूग्ण अमरावती शहराच्या वेगवेगळ्या भागातील आहे.