रशियाचा युक्रेनच्या कारागृहावर हल्ला, 17 कैद्यांसह 22 ठार, 80 जखमी

रशियाने सोमवारी मध्यरात्री युक्रेनमधील एका कारागृहावर ग्लाइट बॉम्ब आणि बॅलेस्टिक मिसाईलने हल्ला केला. या हल्ल्यात 17 कैद्यांसह 22 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 80 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱयानंतर अवघ्या काही तासांत हा हल्ला करण्यात आला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला इशारा देताना म्हटले होते की, जर रशियाने युक्रेनसोबत समझौता केला नाही तर रशियावर कडक प्रतिबंध घातले जातील तसेच टॅरिफचा सामना करावा लागेल, असे म्हटले होते. रशियाने सोमवारी मध्यरात्री हल्ला केला. यावेळी एका तीन मजली इमारतीला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्याचा फटका एका प्रसूती रुग्णालयालाही बसला. यात कमीत कमी चार जणांचा मृत्यू झाला, तर 8 जण जखमी झाले. यामध्ये एका गर्भवती महिलेचाही समावेश असून तिची प्रकृती गंभीर आहे.