राष्ट्रीय हॉकी शिबिरासाठी 22 हॉकीपटूंची निवड

355

हॉकी इंडियाने येत्या 1 आणि 2 नोव्हेंबरला भुवनेश्वर ,ओडिशा येथे आयोजित ऑलिम्पिक पात्रता लढतीच्या संघनिवडीसाठी 22 हॉकीपटूंची राष्ट्रीय हॉकी शिबिरासाठी निवड केली आहे. उद्या सोमवारी हे सर्व हॉकीपटू ओडिशाच्या कलिंगा स्टेडियममध्ये पार पडणाऱ्या निवड शिबिरसाठी संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्राहम रीड यांना रिपोर्ट करणार आहेत.हिंदुस्थानी संघाला ऑलिम्पिक पात्रता लढतीत रशियाशी खेळायचे आहे.

नुकत्याच झालेल्या बेल्जियम आणि स्पेन दौऱ्यात हिंदुस्थानी पुरुष हॉकी संघांनी प्रभावी खेळ केला आहे. त्यांनी बेल्जीयमला 3 कसोटींत तर स्पेनला 2 कसोटींत पराभूत करण्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळे ऑलिम्पिक पात्रता फेरीत हिंदुस्थानी हॉकी संघ जोरदार कामगिरी करील असा विश्वास मुख्य प्रशिक्षक रीड यांनी व्यक्त केला आहे.

हॉकी इंडियाने राष्ट्रीय शिबिरासाठी पी आर श्रीजेश, कृष्णन पाठक, हरमनप्रीत सिंह, वरूण कुमार, सुरेंदर कुमार, बीरेंद्र लाकड़ा, रूपिंदर पाल सिंह, गुरिंदर सिंह, अमित रोहिदास, कोथाजीत सिंह, मनप्रीत सिंह, हार्दिक सिंह, नीलाकांता शर्मा, विवेक सागर प्रसाद, सिमरनजीत सिंह, आकाशदीप सिंह, रमनदीप सिंह, एस वी सुनील, मनदीप सिंह, ललित कुमार उपाध्याय, गुरसाहिबजीत सिंह , शमशेर सिंह यांची निवड केली आहे

बेल्जीयम आणि स्पेन दौरा हिंदुस्थानी हॉकीपटूंसाठी निश्चितच लाँहदायक ठरणार आहे. कारण या दौऱ्यात आमच्या संघाला पेनल्टी कॉर्नरवरील गोलसोबतच मैदानी गोलांची संख्या वाढवण्यात मोठे यश आले आहे. या अनुभवाचा ऑलिम्पिक पात्रता लढतीत मोठा लाभ मिळणार आहे.- ग्रॅहम रीड ,हिंदुस्थानचे मुख्य हॉकी प्रशिक्षक

आपली प्रतिक्रिया द्या