रायगड जिल्ह्यासाठी 234 कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा मंजूर

481

राज्यस्तरीय कोकण विभाग जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 2020-21 च्या बैठकीत रायगड जिल्ह्यासाठी 45 कोटी रुपयांची वाढ करून एकूण 234 कोटी रुपयांच्या प्रारूप आरखड्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

रायगड जिल्ह्यातील पायाभूत सुविधांची निर्मिती, व्हिजन 2022 प्रमाणे आराखडा मांडणी, जिल्ह्यातील सर्व गावे, वाड्यांसाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी आराखडा तयार करणे, मत्स्यविकास योजना, 59 पर्यटन क्षेत्रात सोयी-सुविधा पुरवणे, सुशिक्षित बेरोजगारांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविणे, चार नव्याने पशुवैद्यकीय दवाखाने बांधकाम करणे, उर्वरित ग्रामपंचायत इमारत बांधकाम करणे, जिल्ह्यातील सर्व गावे, वाडी मध्ये समशानभूमी शेड बांधणे, गाव वाडी-वस्तीवर विद्युतीकरण करणे, जिल्ह्यात अॅब्युलन्स स्पीड बोट सुरु करणे, आठवी ते दहावीच्या विद्यार्थीनींसाठी सायकल वितरण, ज्या अंगणवाड्या खाजगी जागेत आहेत त्यांना शासकीय जागा उपलब्ध करुन देऊन जिल्ह्याच्या विकासासाठी गती देण्यात येईल, असेही आदिती तटकरे यांनी सांगितले.

व्हिजन 2022 विकास आराखडा

स्वच्छ भारत निर्माण अभियान, जिल्ह्याचे रस्ते जोडणे, पाणी पुरवठा योजना, जलजीवन योजना, रायगड किल्ला जतन व संवर्धन, एलिफंटा लेणी संक्षिप्त विकास आराखडा, खारलँड विकास, कातकरी विकास आराखडा, कृषी क्षेत्र-रब्बी क्षेत्र व फलोत्पादन, ऑरगॉनिक फार्म वाढविणे, मार्केटिंग, प्रत्येकास पक्की घरे, शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, गळतीचे प्रमाण कमी करणे, प्रगत शिक्षण विकास अभियान, कांदळवन विकास कार्यक्रम, कौशल्य विकास कार्यक्रम, प्लास्टिक मुक्त रायगड जिल्हा, जिल्ह्यातील 84 गावांचे भुस्खलन थांबविणे, मत्स्यव्यवसाय विकास कार्यक्रम, पंतप्रधान विमा योजना, जीवन ज्योत योजना, गाव तेथे दुरसंचार सुविधा, ग्रामीण विद्युतीकरण या महत्वांच्या विकास कामांचा समावेश व्हिजन 2022 मध्ये करण्यात आला आहे, असेही तटकरे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या