सिंधुदुर्गातील 24 विद्यर्थ्यांची गगनभरारी!

599

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिप शाळांमधील 24 विद्यार्थी सोमवारी अभ्यासदौऱ्यासाठी विमानातून त्रिवेंद्रमला रवाना झाले आहे. पहिल्यांदाच विमानात बसल्याचा आनंद आणि वैज्ञानिक सहलीसाठी स्पेस सेंटरला भेट देण्याचा उत्साह विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. 19 ते 23 ऑगस्टदरम्यान भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सहलीत समावेश आहे. हे विद्यार्थी केरळमधील त्रिवेंद्रम येथील इस्रोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर या विज्ञान संस्थेला भेट देण्यासाठी रवाना झाले आहेत. या विद्यार्थ्याना जिल्हा परिषदच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवी, विविध स्पर्धा परिक्षांना सामोरे जाण्यासाठीची प्रेरणा मिळावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांच्या प्रयत्नातून भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ ऐ.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परिक्षेचे आयोजन गेल्या वर्षीपासून करण्यात येत आहे. त्याला संपूर्ण जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला होता. गेल्यावर्षी 24 विद्यार्थ्यांनी विज्ञान सहलीचा अनुभव घेतला होता. या वर्षीच्या परीक्षेत इयत्ता चौथीमधुन 3423 आणि सातवीमधून 2133 विद्यार्थी सहभागी झाले होते. यातून तालुकास्तरावर गुणानुक्रमे तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. तर सातवीमध्ये निवड झालेल्या 24 विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून इस्रोच्या त्रिवेंद्रम येथील विक्रम साराबाई स्पेस सेंटर या केंद्रावर विमान प्रवासासह वैज्ञानिक सहलीची संधी मिळाली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत व मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी विद्यार्थ्याना सहलीसाठी शुभेच्छा दिल्या.

इयत्ता सातवीतील तालुक्यातून प्रथम तिसरा क्रमांक पटकावलेल्या जिल्ह्यातील 24 विद्यार्थ्यांना हवाई सफरीचा आनंद घेता येणार आहे. यामध्ये देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद जामसंडे नंबर 1 येथील निशा पाटील, पद्मजा घाडी, कुवळे नंबर 1 येथील सिद्धी सावळे, दोडामार्ग तालुक्यातील तेरवण नंबर 1 येथील सुनयन फडके, जिल्हा परिषद शाळा सोनावल येथील तन्वी सातार्डेकर, घोडगेवाडी जिल्हा परिषद शाळेतील पुंडलिक कोतेकर, कणकवली तालुक्यातील शिरवल शाळा नंबर 1 येथील अथर्व शिरसाठ, कणकवली नं 3 येथील राज सावंत, ओटव नंबर 1 येथील अमेय मालप, कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद गोठोस शाळा नंबर 1 येथील विद्या बांदेकर, आंबेरी नंबर 1 येथील वैदिका बागवे, डिगस नंबर 1 येथील सानिया मेस्त्री, मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद गोळवण नंबर 1 मधील राजकुमार दुखंडे, मसुरे नंबर 1 येथील शिशिर मेहंदळे, गोळवण नंबर 1 येथील संघमित्रा पवार, सावंतवाडी तालुक्यातील मांडखोल नंबर 1 धवडकी येथील विणा सावंत, कास नंबर 1 प्रथमेश कासकर, मांडखोल नंबर 1 येथील सौज्ञा नाईक, वैभववाडी तालुक्यातील नाधवडे ब्राम्हणदेव नवलादेवी वाडी येथील प्रणय बोभाटे, सिद्धेश भराडे, नायदेकातरवाडी येथील उत्कर्षा पावणोजी , तुळस जैतीर येथील सोहम परब, उभादांडा नंबर 1 येथील मयुरी नार्वेकर या 24 विद्यार्थ्यांना विमान प्रवासाची संधी मिळाली आहे.

असा असेल अभ्यासदौरा
19 ऑगस्ट रोजी विमान प्रवास, 20 ऑगस्ट रोजी तिरुअनंतपुरम येथे आगमन, तेथील शाळांना भेट व चर्चा सत्र, कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारकाला भेट व चर्चा सत्र, कन्याकुमारी मंदिर दर्शन, 21 ऑगस्ट रोजी त्रिवेंद्रम येथील इस्रोच्या विक्रम साराभाई स्पेस स्नेटरला भेट, म्युझिअम पाहणी, रॉकेट लॉंचिंग अनुभव घेणे, नेपियर म्युझियमला भेट, पद्मनाभ मंदिर पाहणी, रात्री चर्चा सत्र 22 ऑगस्ट रोजी रेल्वेने परतीचा प्रवासाला सुरुवात, 23 रोजी विद्यार्थी सिंधुदुर्गात दाखल होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या