
बीड जिल्ह्यात एका 24 वर्षीय तरुणीने तरुणाच्या सततच्या छेडछाडीस कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्या प्रकरणी त्या तरुणाविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी वैजनाथ शहरात जगतकर गल्लीत राहणारी निकीता जगतकर ही तरुणी नर्सिंगचे शिक्षण घेत होती. कॉलेजला जात येत असताना तरुण उस्मान लतीफ शेख हा तिला सतत त्रास देत होता. तसेच मोबाईल नंबर मिळवून फोनवरही सतत भेटण्याची विनंती करत होता. हा होणारा त्रास तरुणीने वडिलांना सांगितला. वडिलांनी त्याचा फोन घेऊ नको असा सल्ला दिला. वडिल आपल्या नातेवाईकांना घेऊन उस्मान शेखच्या घरी जाणार होते. पण या तरूणीने आई वडील बाहेर गावी गेल्यानंतर 12 जूनला आत्महत्या केली. दुपारी आई, वडील आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
वडिलांनी उस्मान शेख मुळेच मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली.या तक्रारीवरून 24 जूनला संभाजीनगर पोलीस ठाण्यात या तरुणाविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल धस हे करत आहेत.





























































