भाजप आमदाराच्या अधिकृत निवासस्थानात तरुणाचा गळफास; प्राथमिक तपासात महत्त्वाची माहिती आली समोर

Shreshtha Tiwari (right) with MLA Yogesh Shukla (left)

लखनौमध्ये रविवारी रात्री उशिरा भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार योगेश शुक्ला यांच्या शासकीय निवासस्थानी एका तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली. लखनौमधील हजरतगंज भागात असलेल्या शुक्ला यांच्या सरकारी निवासस्थानी ही घटना घडली.

मृत तरुणाचं नाव श्रेष्ठ तिवारी (24 वर्ष) असं असून तो उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील हैदरगडचा रहिवासी होता.

तिवारी हे लखनौमधील बक्षी का तालब (BKT) विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश शुक्ला यांच्याशी संबंधित मीडिया टीमचा हा तरुण सदस्य होता.

कौटुंबिक वादातून तरुणानं आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे, असं पोलिसांनी सांगितलं. तिवारी यांच्या मृत्यूमागील परिस्थितीचा शोध घेण्यासाठी पुढील चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी सांगितलं की, श्रेष्ठ तिवारी याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.