
येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने कारागृहातील अधिकाऱयांची बनावट स्वाक्षरी करून मनी ऑर्डर पुस्तिकेत फेरफार करून 26 लाख 69 हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी कैद्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन रघुनाथ फुलसुंदर असे गुन्हा दाखल केलेल्या कैद्याचे नाव आहे. याबाबत कारागृह अधिकारी बाबूराव मोटे (वय 38) यांनी फिर्याद दिली आहे. फेब्रुवारी 2012 ते ऑगस्ट 2023 दरम्यान हा प्रकार घडला. येरवडा कारागृहात कारखाना विभागात काम करणाऱया कैद्यांना दररोज वेतन दिले जाते. वेतनातून मिळणारी रक्कम काही कैदी टपाल खात्याच्या मनी ऑर्डर सुविधेद्वारे कुटुंबीयांना पाठवितात. मनी ऑर्डरच्या नोंदणी पुस्तिकेत त्याने कारागृह अधिकाऱयांच्या बनाकट स्काक्षरी, बनाकट हिशेब, तसेच अन्य कैद्यांची नावे टाकून 26 लाख 69 हजार 911 रुपयांचा अपहार केला. कारागृहातील अधिकाऱयांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे तपास करत आहेत.

























































