अमरावतीत आढळले कोरोनाचे 262 रुग्ण, तिघांचा मृत्यू

अमरावती जिल्ह्यात गेल्या 24 तासात 262 रुग्ण सापडले आहेत. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात मृत्यू झालेल्या रुग्णात मुर्तिजापूर येथील 40 वर्षी़य पुरुष, नांदगाव खंडेश्वर येथील 60 वर्षी़य पुरुष व मुजफ्फरपूरा येथील 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्यामुळे मृतकांची संख्या अमरावती जिल्ह्यात 262 झाली आहे.

दरम्यान आज दुपारपर्यंत आलेल्या अहवालानुसार 262 कोरोनाचे नवे रुग्ण आढळुन आले आहे. मेळघाटातील चिखलदरा पोलीस ठाण्यात 2 पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित आढळुन आले असून पंचायत समितीचे सुध्दा 2 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाग्रस्ताचा आकडा 12 हजार 478 वर पोहचला आहे.

आज आढळुन आलेल्या कोरोनाबाधितात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळुन आले आहे. वरुड तालुक्यात सर्वाधिक 12 रुग्ण आढळुन आले आहे. या सोबतच अचलपूर, दर्यापूर, चांदूरबाजार, मोर्शी येथील कोरोनाचे रुग्ण आहेत. सध्या उपचारार्थ 2 हजार 492 रुग्ण असून त्यापैकी 12 रुग्ण नागपूर येथे भर्ती आहे. गृहविलगीकरणात 1 हजार 13 रुग्ण असून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 9 हजार 479 आहे. उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी दररोज 300 पेक्षा जास्त रुग्ण कोरोनाबाधित आढळुन येत होते. दोन दिवसांपासून कोरोनाग्रस्ताची संख्या कमी होत असून सध्या 250 पर्यंत रुग्ण कोरोनाबाधित आढळुन येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या