देशात आतापर्यंत 27 कोटी 66 लाखांहून अधिक जणांचे लसीकरण पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीचे 27 कोटी 66 लाख डोस आतापर्यंत देशातील लाभार्थ्यांना देण्यात आले आहेत. शनिवारी दिवसभरात 38 लाख 10 हजार डोस देण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने सांगितलं. त्यातल्या 32 लाख लाभार्थ्यांना पहिली तर 5 लाखाहून जास्त लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला.

आतापर्यंत देशातील 22 कोटी 55 लाख जणांना पहिला तर 5 कोटी 10 लाख जणांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. 18 ते 44 वर्ष वयोगटातल्या 5 कोटी 50 लाख जणांना एक डोस देण्यात आला आहे. शनिवारी या वयोगटातल्या 21 लाख लाभार्थ्यांनी पहिला तर एक लाख जणांनी दुसरा डोस घेतला.

देशात कोविड चाचण्यांनी 39 कोटी 10 लाखाचा टप्पा ओलांडला आहे. देशभरात 2 हजार 661 प्रयोगशाळा कोरोना तपासणीसाठी कार्यरत आहेत. त्यातल्या 271 प्रयोगशाळा सरकारी तर एक हजार 390 प्रयोगशाळा खासगी आहेत.