
बेस्टच्या ताफ्यात 28 इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बसचे लोकार्पण केले.
बेस्टचे आधुनिकीकरण होत असून शिवसेनेने दिलेल्या वचनाप्रमाणे लवकरच बस आणि लोकलासाठी एकच तिकीट चालेल यावर नियोजन सुरू असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
या वेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकरही उपस्थित होत आहे. नव्या इलेक्ट्रिक बस समाविष्ट केल्याने ताफ्यात आता 270 बस झाल्या आहेत.
2023 च्या मध्यापर्यंत 1800 इलेक्ट्रिक बसचे लक्ष्य बेस्टने ठेवले आहे. या बस उत्सर्जनमुक्त असतील आणि यांचा आवाजही होणार नाही.
या आठवडयापासून मुंबई शहरात पूर्णपणे फक्त इलेक्ट्रिक बसेस चालतील. उपनगरातही अनेक बस इलेक्ट्रिक असतील, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.


































































