
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकडणुकांत ओबीसी आरक्षण लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे सोलापूर महापालिकेत 29, तर जिल्हा परिषदेत 24 ओबीसी सदस्य निवडले जाणार आहेत. आगामी निवडणुकीत महापालिकेसाठी 113, तर जिल्हा परिषदेसाठी 77 सदस्य निवडले जातील.
महापालिका निवडणुकीत 113 नगरसेवक निवडून येणार आहेत. यात 27 टक्के ओबीसींना आरक्षण असल्याने सुमारे 29 ते 31 नगरसेवक ओबीसीचे असतील. यासाठी आरक्षण काढण्यासाठी राज्य निवडणूक आयोग पालिकेस आदेश देणार आहे. त्यानुसार पालिका निकडणुका प्रक्रिया करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त शिकशंकर यांनी दिली. अनुसूचित जाती क अनुसूचित जमातीचे आरक्षण निश्चित केले. महिलांचे आरक्षण निश्चित केले. नक्याने 27 टक्के ओबीसी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.
सोलापूर जि.प.त 24 सदस्य ओबीसी प्रवर्गातील
जिल्हा परिषदेच्या एकूण 68 सदस्यांमध्ये 21 सदस्य ओबीसी प्रवर्गातील होते. त्यामध्ये दहा पुरुष क 11 महिला सदस्यांचा समावेश होता. आगामी जिल्हा परिषद निकडणुकांमध्ये जिल्हा परिषदेचे एकूण 77 सदस्य असतील. त्यापैकी 24 सदस्य ओबीसी प्रवर्गातील असतील.
























































