
7 जुलै रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असललेल्या राजगृहावर काही समाजकंटकानी तोडफोड केली होती. या प्रकरणी भीमराव यशवंत आंबेडकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. आज पोलिसांनी विशाल मोर उर्फ विठ्ठ काण्याला अटक केली आहे.
7 जुलै रोजी राजगृहाच्या आवारातील फुलझाडांच्या कुंड्या पाडून नासधूस केली होती. या प्रकरणी पोलिसांनी 9 जुलै रोजी उमेश जाधव या आरोपीला अटक केली होती. आज पोलिसांना सीसीटीव्ही आणि खबर्यांमर्फत दुसर्या आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. दुसर्या आरोपीचे नाव विशाल मोरे उर्फ विठ्ठल काण्या असून कल्याणहून अटक करण्यात आली आहे. विठ्ठल काण्याने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलीस पुढील तपास सुरू केला आहे.


























































