राजधानी दिल्लीत ‘इसिस’च्या 3 दहशतवाद्यांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने तीन दहशतवाद्यांना शनिवारी अटक केली आहे. हे दहशतवादी इस्लामिक स्टेट जम्मू आणि कश्मीर (आयएसजेके)चे असल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठाही पोलिसांनी जप्त केला आहे.

दिल्लीत दोन अतिरेकी घुसल्याची खबर दिल्ली पोलिसांनी मंगळवारी दिली होती. या अतिरेक्यांची छायाचित्रेही पोलिसांनी जारी केली होती, मात्र हे अटक झालेले अतिरेकी तेच आहेत का हे अद्यापि स्पष्ट झालेले नाही. दिल्ली शहरात मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या हेतूने सदर दहशतवादी दिल्लीत घुसले होते. जिथे परदेशी नागरिक मोठय़ा संख्येने येतात अशा ठिकाणांवर पोलिसांनी नजर ठेवली होती. हिजबुल मुजाहिदीनच्या एका दहशतवाद्याला पोलिसांनी मंगळवारी अटक केली होती.

काही दिवसांपूर्वी कश्मीरात पोलीस उपनिरीक्षक इम्तियाज अहमद यांची हत्या झाली होती. अहमद यांची हत्या करणारा अन्सार उल हक या दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने अटक केली आहे.