सामना ऑनलाईन, ठाणे
ठाण्यातील ढोकाळी परिसरात 3 सफाई कामगारांचा मृत्यू झाला आहे तर 5 कामगारांना अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी टाकी साफ करत असताना ही दुर्घटना घडली आहे. प्राईड प्रेसिडेंसी लक्झरिया सप्तश्री हाईट या इमारतीसमोर असलेल्या स्वामी कृपा सोसायटी जवळ ही दुर्घटना घडली आहे.अमित पुहल (20 वर्षे), अमन बादल (21 वर्षे), श्री अजय बुंबाक (24 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत
या दुर्घटनेमध्ये अत्यवस्थ झालेल्या कामगारांची नावे खालीलप्रमाणे आहेत
- वीरेंद्र हातवाल (25 वर्ष)
- मनजीत वैद्य (25 वर्ष)
- जसबीर पुहल (24 वर्षे)
- अजय पुहल (21 वर्षे)
- रुमर पुहल (30 वर्षे)

































































