झिरो चित्रपटासाठी मेरठवरून आले 300 कामगार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

दिग्दर्शक आनंद एल राय यांनी झिरो या चित्रपटाच्या शूटींगसाठी मुंबईत मेरठ शहर उभारले होते. त्यासाठी त्यांनी मेरठ शहरातून 300 कामगारांना मुंबईत आणले होते. या कामगारांनी तयार केलेला सेट हा अगदी खराखुरा वाटावा म्हणून राय यांनी स्वत: सेटच्या तयारीकडे लक्ष दिले होते.

झिरोसाठी फिल्मसिटीत एक मोठा सेट उभारण्यात आला होता. त्यात मेरठमधील प्रसिद्ध घंटाघर, मेरठमधील वेगेवगळ्या वास्तू उभारण्यात आल्या होत्या. आनंद एल राय यांनी याआधी रांझना आणि तनु वेड्स मनू या चित्रपटामध्ये देखील मुंबईच्या फिल्मसिटीमध्ये बनारस व कानपूर शहरांचे सेट तयार केले होते.

झिरो या चित्रपटात शाहरुख खान हा एका बुटक्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच अनुष्का शर्मा ही सेरेब्रल पाल्सी हा आजार झालेल्या लेखिकेच्या भूमिकेत आहे तर कतरिना कैफ ही प्रसिद्ध अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे.