सिक्कीममध्ये अन्नावाचून 300 याकचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

सिक्किम मध्ये गेल्या एक वर्षात 300 याकचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बर्फवृष्टीमुळे अन्न न मिळाल्यामुळे यांचा मृत्यू झाला आहे.

डिसेंबर 2018 पासून ही आकडेवारी आहे. मुंगटुक भागातील 250 याक असून उर्वरित पन्नास याक हे युमथांग भागातील आहे. बर्फवृष्टीमुळे याकपर्यंत चारा पाणी न पोहोचल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. पशुपालना विभागाची एक टीम घटनास्थळी पोचली आहे. त्यांच्यापर्यंत चार पोहोचवण्यावी व्यवस्था करण्यात आली. 25 कुटुंबांच्या मालकीची हे 30 याक होते. याकपासून यापासून दूध आणि लोकरीचे वस्तू त्यांना मिळत व त्यावरच उदरनिर्वाह चालत होता.