राज्यात कोविड गुन्ह्यांमध्ये 31 कोटींची दंड आकारणी – गृहमंत्री अनिल देशमुख

anil-deshmukh

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम 188 नुसार 2 लाख 82 हजार गुन्हे, तसेच 1347 वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल झाले. तर 31 कोटी 48 लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आली, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात 22 मार्च ते 14 ऑक्टोबरपर्यंत कलम 188 नुसार 2, 82, 523 गुन्हे नोंद झाले असून 41,291 व्यक्तींना अटक करण्यात आली. तसेच 96,583 वाहने जप्त केली. यातील विविध गुन्ह्यांसाठी 31 कोटी 48 लाख 75 हजार 482 रु. दंड आकारण्यात आला, अशी माहिती त्यांनी दिली.

या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या 374 घटना घडल्या. त्यात 900 व्यक्तींना, ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे. पोलीस विभागाचा 100 नंबर हा सर्व जिल्ह्यात 24 तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर 1,13,999 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1347 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर 96,583 वाहने जप्त करण्यात आली. राज्यातील 239 पोलीस व 25 अधिकारी अशा एकूण 264 पोलिस कर्मचारी/अधिकाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या