
राज्यातील 33 कोटी वृक्ष लागवडीत झालेल्या गैरप्रकारच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीला अहवाल सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता पुढील अधिवेशनाच्या अखेरच्या दिवसापर्यंत ही मुदत वाढवून देण्यात आली आहे. राज्यात 2018 ते 2020 या काळात झालेल्या 33 कोटी वृक्ष लागवडीसंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने समितीची नेमणूक केली होती. या समितीत विधीमंडळाच्या सदस्यांच्या एकूण 16 जणांचा समावेश करण्यात आला होता. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. त्यामुळे या समितीकडून हा अहवाल लवकरच विधानसभेत सादर केला जाण्याची शक्यता गेल्या अनेक दिवसांपासून व्यक्त केली जात होती. अखेर या समितीला अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव प्रस्ताव राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंगळवारी विधानसभेत मांडला.


























































