अरे देवा! 33 वर्षीय व्यक्तीनं गिळला टुथब्रश

लहान मुलांनी नाणी, टाचणी गिळल्याचे आपण अनेकदा ऐकले आहे. मात्र संभाजीनगरमध्ये नुकतीच एक अजब घटना घडली आहे. एका 33 वर्षीय व्यक्तीने दात घासताना चुकून टुथब्रशच गिळला आहे. सिटीस्कॅमध्ये या व्यक्तीच्या पोटातील लांबलचक टुथब्रश पाहून डॉक्टरदेखील हैराण झाले. तब्बल दीड तास गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी या व्यक्तीच्या पोटातून ब्रश काढला आहे.

ही घटना 26 डिसेंबरला रविवार बाजार परिसरात घडली आहे. चुकून टुथब्रश गिळल्यामुळे या व्यक्तीच्या पोटात असहय्य वेदना होऊ लागल्या. तातडीने त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सीटी स्कॅनमध्ये डॉक्टरांना या व्यक्तीच्या पोटात टुथब्रश दिसला. लांबलचक टुथब्रश त्याने कसा गिळला, या विचाराने डॉक्टरदेखील हैराण झाले. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून टुथब्रश बाहेर काढला. सध्या या व्यक्तीची प्रपृती ठणठणीत आहे.

या शस्त्रक्रियेसाठी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ. सरोजिनी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शल्यचिकित्सा पथक क्रमांक-6 चे प्रमुख जुनेद एम. शेख, डॉ. अविनाश घाटगे, डॉ. ओमर खान, डॉ. संदीप चव्हाण, डॉ.सुकन्या विंचूरकर, डॉ. गौरव भावसार आदींच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया पार पाडली.

आपली प्रतिक्रिया द्या