कचऱ्यात फेकले  34 अब्जांचे बिटकॉइन; आयटी इंजिनीअर आठ वर्षांपासून घेतोय शोध 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका आयटी कर्मचाऱ्याचा हार्ड ड्राइव्ह हरविल्याने त्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे. कारण त्या हार्ड ड्राइव्हमध्ये  क्रिप्टोग्राफिकचा पासवर्ड सेव्ह केलेला होता. पासवर्ड एवढा महत्त्वाचा आहे की, त्यामध्ये आयटी कर्मचाऱ्याचे 34 अब्ज रुपये अडकले आहेत. मागील आठ वर्षांपासून तो कर्मचारी हार्ड ड्राइव्हचा शोध घेत आहे. आता तर त्याने नासाकडे मदत मागितली आहे.

2013 मध्ये जेम्सचा आयटी इंजिनीअर हॉवेल्स याने चुकून त्याचा हार्ड ड्राइव्ह कचऱ्यात फेकला होता. बिटकॉइनचा अॅक्सेस मिळविण्यासाठी या क्रिप्टोग्राफिक प्रायव्हेट कीचा वापर केला जातो. हॉवेल्सकडे 340 दशलक्ष पाऊंडचे बिटकॉइन्स आहेत. हिंदुस्थानी चलनात त्याची किंमत साधारणपणे 34 अब्ज एवढी आहे. हॉवेल्सला कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून हार्ड ड्राइव्ह शोधायचा आहे, परंतु त्याला अधिकारी परवानगी देत नाहीत. हॉवेल्सने त्यातील 25 टक्के रक्कम शहराच्या कोविड रिलिफ फंडाला देण्याचा प्रस्तावदेखील दिला आहे, मात्र तरीही अधिकारी त्याचे ऐकायला तयार नाहीत.

हॉवेल्सने हार्ड ड्राइव्ह शोधण्यासाठी आता जगभरातील इंजिनीअर, पर्यावरणवादी आणि डेटा रिकव्हरी तज्ञांशी संपर्क साधला आहे. यासाठी त्याने ऑनट्रक कंपनीचीदेखील मदत घेतली आहे. हॉवेल्सने नासाच्या इंजिनीअरमार्फत या कंपनीची मदत मागितली आहे.