दुसऱ्या टप्प्यातील 38 उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

महाराष्ट्रातील लोकसभेच्या दुसऱया टप्प्यातील दहा लोकसभा मतदारसंघांतील 178 उमेदवारांपैकी 38 उमेदवारांची गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे. यापैकी 23 उमेदवारांच्या विरोधातील गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे आहेत, अशी माहिती ’महाराष्ट्र इलेक्शन वाँच- एडीआर’ या संस्थेने दिली आहे. महाराष्ट्रात दुसऱया टप्प्यासाठी 18 एप्रिल रोजी बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, धाराशीव, लातूर आणि सोलापूर अशा दहा ठिकाणी मतदान होणार आहे.