
सामना प्रतिनिधी । नगर
नगर मनमाड महामार्गावर नांदगाव शिवारात तसेच बुर्हानगर पाट्यापाशी वाळुची चोरून वाहतूक करत असताना स्थानिक अन्वेषन विभागाच्या पथकाने वाळु तसेच चार डंपर असा सुमारे 43 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये योगेश बिरा माळी (वय 26, रा.नांदगाव ,ता.नगर), ज्ञानेश्वर विराम हातेकर (वय 24, रा.नांदगाव, ता.नगर), सुभाष रामु निकम (वय 24 रा.शिंगवे नाईक ता.नगर), अशेाक भगवत काळे (वय 58, रा.शिंगवेनाईक,ता.जि.नगर) तर दुसर्या कारवाई रवी बर्डे (वय 21, राहणार देसवंडी, ता. राहुरी) यांचा समावेश आहे.
नगर जिल्हयात अवैध वाळु उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषन विभागाच्या पथकाने नगर मनमाड महामार्गावरील नांदगाव येथे वाळुची चोरी करत असताना वरील आरोपींच्या मुसक्या आवळ्या आहेत. यांच्या ताब्यातुन चार डंबर ताब्यात घेतले आहेत. सदरची कारवाई पोलिस अधिक्षक ईशु सिंधू यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलिस अधिक्षक दिलीप पवार यांच्या पथकातील रविंद्र कर्डिले, सचिन अडबल, संतोश लोंढे, राहुल सोळंके, रणजित जाधव, ज्ञानेश्वर शिंदे, रोहित मिसाळ, संदिप चव्हाण, संभाजी कोतकर आदीच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
































































