
सामना ऑनलाईन । मुंबई
मालाडमधील मालवणी भागात चार नराधमांनी एका कुत्र्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या नराधमांनी त्या कुत्र्याचे पाय बांधून त्याच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या कुत्र्याला एका रिक्षाचालकाने प्राण्यांच्या रुग्णालयात दाखल केले. या कुत्र्यावर सध्या अॅनिमल मॅटर टू मी या संस्थेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मालवणी चर्च भागात एका रिक्षावाल्याला झाडीतून कुत्र्याच्या ओरडण्याचा आवाज आल्याने तो झाडीच्या दिशेने गेला. तेव्हा चार जण त्या कुत्र्याचे पाय बांधून त्याच्यावर बलात्कार करत असल्याचे त्याला दिसले. त्याने आरडो ओरडा केला असता ते नराधम तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर त्या रिक्षाचालकाने सुधा फर्नांडीस या प्राणीमित्र महिलेला याविषयी सांगितले. त्यानंतर त्या दोघांनी त्या कुत्र्याला रुग्णालयात दाखल केले.
‘पीडित कुत्र्याला त्याच्यासोबत झालेल्या प्रकाराचा जबरदस्त धक्का बसला आहे. त्याच्या जवळ जरी कुणी गेले किंवा त्याला स्पर्श केला तरी तो रडायला, ओरडायला लागतो’, असे अॅनिमल मॅटर टू मी या संस्थेच्या संस्थापक डॉ. अंकिता पाठक यांनी सांगितले.




























































