सराईत गुडांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेकडून 24 तासात अटक

403

खंडणीसाठी अपहरण करुन दरोडा टाकणाऱ्या टोळीला अटक करण्यास गुन्हा अन्वेशन विभागाला यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 24 तासात आरोपींना अटक केली आहे. आरोपीमध्ये राजेंद्र गंगाधार मुंगसे (वय 30 वर्षे, रा.बोल्हेगांव गावठाण,नगर), ओंकार शंकर गुंजाळ (वय 22, वर्षे, रा.मगर वस्ती, बकोरी, वाघोली, जि.पुणे), अमन दस्तगीर (वय 20 वर्षे, रा.गाडेवस्ती, बकोरी फाटा, वाघोली, ता.हवेली, जि.पुणे), ईशाप्पा जगन्नाथ पंदी (वय 20 वर्षे, रा.बाकेरी फाटा, वाघोली, ता.हवेली,जि.पुणे) यांचा समवेश आहे.

24 जानेवारी रोजी दुपारी अक्षय रावसाहेब जायभाय (वय 23, रा.आदर्शनगर, नागपूर, नगर) यांना त्यांचा मोबाईलवर सोन्या सोनवणे या नावाच्या व्यक्तीने फोन करून तुम्हाला लग्नाची पत्रिका द्यायची आहे, असे खोटे सांगून त्यांना निंबळक रोडवर रणजीत पेट्रेाल पंपामागे बोलावून घेतले. या ठिकाणी काटवणानामध्ये कारजवळ थांबलेला पाच अनोळखी व्यक्तींना त्यांना मारहाण करुन व पिस्टलचा धाक दाखवून बळजबरीने कारमध्ये बसवले. निंबळक बायपास रोडने विळद घाटमार्गे सोवडी येथे नेऊन 20 लाखांच्या खंडणीची मागणी केली. यानंतर पुणे रोडवर नेऊन पुन्हा अक्षयच्या आईला फोन करुन खंडणीची मागणी केली. पैसे नाही दिले तर मुलास ठार मारु अशी धमकी दिली. यानंतर आरोपी मोबाईल घेवून राळेगणसिध्दी मार्गे पानोली घाटात अक्षयला घेवून गेले. त्याच्याकडून 2 हजार रुपये काढून घेत गाडीमधून खाली ढकलून दिले. यानंतर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर स्थानिक गुन्हे शाखच्या पथकाने अक्षय यांच्याकडून माहिती घेत तपासाची दिशा ठरवली. यानंतर मुंगसे यांना विश्‍वासात घेवून विचारपूस केली. पोलिसांनी खाक्या दाखवताच गुन्ह्याचा उलगडा झाला. आरोपींच्या झतीमध्ये 20,400 रुपये किंमतीचा गावठी गट्टा, छर्‍याचे पिस्टल, 6 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहे.

ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी, ग्रामीण विभागचे अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी शिरीकूमार देशमूख, पोहेकॉ बाळासाहेब मूळीक, सोन्याबापू नानेकर, दिपक शिंदे, रविंद्र कर्डिले, विजय ठोंबरे, संदीप पवार, राहूल सोळूंके, सागर सुलाखे, रोहित मिसाळ, सागर ससाणे, मयूर गायकवाड, दिगंबर कारखेले, संभाजी कोतकर यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या