
गेल्यावर्षी अतिवृष्टीने 26/27 जुलै रोजी बदलापूरात पुरजन्य परिस्थिती निर्माण होऊन वांगणी ते बदलापूर दरम्यान ‘महालक्ष्मी एक्सप्रेस’मध्ये दहा तासांहून अधिककाळ प्रवासी अडकले होते. याप्रसंगी एनडीआरएफ, नौदल, अग्निशमन दलाशी समन्वय ठेवत प्रवाशांची सुटका करण्यात बहुमोल योगदान देणाऱया रेल्वे सुरक्षा बलाच्या चार जवानांना रेल्वे सुरक्षा बल महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले आहे.
याप्रसंगी एनडीआरएफ, नौदल आदी यंत्रणांशी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी योग्य समन्वय ठेवत रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी मोठी जबाबदारी पार पाडली होती. प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी नेऊन पोहचविण्याचे काम जवानांनी पार पाडले. लोकमान्य टिळक टर्मिनसचे आरपीएफ कर्मचारी हेड कॉन्स्टेबल एस.पी.ठाकtर, कॉन्स्टेबल एस.पी.शरद घारटे, राहुल पुमार, जितेंद्र यादव यांना आरपीएफ महासंचालक सन्मानचिन्हाने गौरविण्यात आले आहे. मध्य रेल्वे आरपीएफचे विभागीय सुरक्षा आयुक्त के.के.अश्रफ यांच्या हस्ते प्रतिष्ठीत डीजी सन्मानचिन्ह जवानांना प्रदान करण्यात आले.



























































