नाट्यनिर्मितीसाठी निर्मात्यांना पुढील आठवड्यात अनुदान, 40 लाखांचा निधी मंजूर

नाट्यनिर्मिती संस्थांना नवीन नाट्यनिर्मितीसाठी अनुदान योजनेअंतर्गत असणारे प्रयोग अनुदान पुढील आठवड्यात निर्मात्यांच्या खात्यात जमा होईल, असे सांस्पृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे. यासाठी 40 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती अमित देशमुख यांनी दिली.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या मार्फत नाटय़ अनुदान योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत नवीन नाटके, संगीत नाटके, प्रयोगात्मक नाटके यांना निर्मितीसाठी अनुदान दिले जाते. मात्र काही नवीन नाटकांना सदरील अनुदान मिळाले नव्हते. यासंदर्भात संबंधितांना सूचना दिलेल्या असून लवकरच हे नाट्य अनुदान वितरित केले जाईल असे देशमुख यांनी सांगितले आहे. सांस्कृतिक कार्य विभाग नेहमीच नाट्य कलावंत व निर्माते यांच्या पाठीशी उभा असल्याची ग्वाही सांस्पृतिक कार्यमंत्र्यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या