40 टक्के श्रमिक ट्रेन लेट, सरासरी 8 तास उशीर

480

कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अडकलेल्या प्रवासी मजुरांसाठी केंद्र सरकारने श्रमिक रेल्वेची व्यवस्था केली होती. या श्रमिक रेल्वे सुरूवातीला व्यवस्थित चालू होत्या. परंतु अनेक ठिकाणी या ट्रेन उशीरा पोहोचायाला लागल्या. त्यामुळे पुन्हा मजुरांचे हाल होत होते.

आतापर्यंत चालवण्यात आलेल्या श्रमिक ट्रेनपैकी 40 टक्के ट्रेन या उशीरा धावत होत्या. सरासरी 8 तास या श्रमिक ट्रेन उशीरा धावत होत्या. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार बहुतांश ट्रेन या उत्तर प्रदेश, बिहार आणि पूर्वेकडील राज्यांसाठी सोडल्या होत्या. ज्या 78 ट्रेन्संना एक दिवसापेक्षा अधिक उशीर झाल्या आहेत त्यात सर्वाधिक ट्रेन महाराष्ट्र आणि गुजरातहून रवाना झाल्या होत्या, त्यांची संख्या 53 इतकी होती.

उशीरा ट्रेनचे प्रमाण

  • 421 ट्रेन 10 तासांपेक्षा उशीरा धावत होत्या.
  • 373 ट्रेन्स 10 ते 24 तास उशीरा धावत होत्या.
  • 78 ट्रेन्स या 24 तासांपेक्षा अधिक उशीरा धावत होत्या.
  • 43 ट्रेन्स या 30 तासांपेक्षा उशीरा धावत होत्या.
  • तर काही ट्रेन्स तब्बल दोन दिवसांपेक्षा अधिक उशीरा धावत होत्या.

गाड्या उशीरा धावण्याचे कारण

एकाच दिशेने रुळावर अनेक ट्रेन धावत होत्या त्यामुळे ट्रेन्स उशीरा धाव होत्या. तसेच बहुतांश ट्रेन्स या उत्तर प्रदेश बिहारकडे जात होत्या त्यामुळे या मार्गावर ताण वाढत होता. लॉकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद होती, त्यामुळे अनेक मजुरांना स्टेशनपर्यंत पोहोचण्यास उशीर होत होता.

रेल्वे अधिकार्‍यांचे उत्तर

बंगाल, ओडिशामध्ये अम्फन वादळाचा प्रभाव होता, त्यामुळे अनेक ट्रेन्सच्या रूटमध्ये बदल करण्यात आला अशी माहिती रेल्वे अधिकार्‍यांनी दिली. तसेच्च एका रुटवर 24 तासात काही ट्रेन्स चालवण्याची सीमा असते. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुक कोंडी झाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या