40 गद्दार घरी जातील, निर्णय मात्र उद्धव ठाकरेंच्याच बाजूनं लागेल! आमशा पडवींनी व्यक्त केला विश्वास

aamshya padvi

विधानसभा आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू आहे. विधानसभा अध्यक्षंच्या समोर ही सुनावणी सुरू आहे. यादरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आमशा पडवी यांनी एक मोठं विधान केला आहे. कितीही ‘तारीख पर तारीख’ दिल्यातरी निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच लागेल, असा विश्वास आमशा पडवी यांनी व्यक्त केला. ‘ज्यांचा पक्ष त्यांच्याच बाजूनं निकाल लागेल. कारण तुम्ही आम्ही सगळे बघोतो आहोत. घटना जी असते ती तुम्ही आम्ही बनवत नाही. निवडून आलेला व्यक्ती हा त्यासंस्थेचा मालक होऊ शकत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मी विधान परिषदेतचा सदस्य आहे, मी मालक नाही. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की कितीही तारीख दिल्या, तारीख पर तारीख कितीही दिल्या तरी देखील हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच लागेल, असा विश्वास पडवी यांनी व्यक्त केल्या. खोटं जास्ती दिवस चालू शकणार नाही. किती दिवस थांबवतील? तारीख पर तारीख देऊन थोडेच दिवस थांबवतील फार दिवस थांबवणार नाही. 40 गद्दार हे एक दिवस घरी जाऊन झोपतील, उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच निर्णय लागेल, असं त्यांनी सांगितलं.