
लोकसभेतील 540 खासदारांपैकी 403 खासदारांनी कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळी अधिवेशनाचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक खासदारांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला, परंतु त्यांना कोरोनाची लागण झाल्याने दुसरा डोस देण्यात आला नही. त्यामुळे आता जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशन होणार आहे.
30 खासदारांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली की नाही याबाबत काहीच माहिती दिली नाही. त्यामुळे या संसदेचे कर्मचारी या खासदारांना सातत्याने संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनामुळे संसदेच्या कामकाजावरही परिणाम झाला, त्यामुळे गेल्या वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि पावसाळी अधिवेशन लवकर संपवण्यात आले.
संसदेत अध्या 40 हून अधिक बिल आणि पाच अध्यादेश प्रलंबित आहेत. देशात आतापर्यंत 50 आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. तर रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्यासह तीन खासदारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजही हिंदुस्थानातील काही भागांत कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे कोरोना चाचणी आणि सोशल डिस्टन्सचे पालन करून अधिवेशन पार पाडले जाईल.


























































