
पोलीस खात्यात 30 वर्षे सेवा पूर्ण झालेलेव सहाय्यक उपनिरीक्षक पदावर तीन वर्षांपूर्वी पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱयांना आता श्रेणी उपनिरीक्षकपदी बढती मिळणार आहे. त्याची सुरुवात होळीच्या मुहूर्तावर पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी 43 सहाय्यक उपनिरीक्षकांच्या खांद्यावर आणखी एक स्टार लावून केली.
तीन वर्षांपूर्वी सहाय्यक उपनिरीक्षकपदी बढती मिळालेल्या अधिकाऱयांना श्रेणी उपनिरीक्षक म्हणून संबोधण्यात यावे अशी तरतूद 25 फेब्रुवारी 2022 च्या शासन निर्णयात करण्यात आली होती. त्यानुसार आयुक्त संजय पांडे यांनी होळीच्या दिवशी प्रातिनिधिक स्वरूपात दक्षिण प्रादेशिक विभागातील पात्र ठरलेल्या 43 सहाय्यक उपनिरीक्षकांना श्रेणी उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली. आता 30 वर्षे पोलीस सेवा पूर्ण केलेल्या आणि तीन वर्षांपूर्वी सहाय्यक फौजदार बनलेल्या आता श्रेणी उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात येणार आहे.


























































