मुंबईत कोरोनाचे 446 रुग्ण 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोनाची संख्या वाढत असून आज दिवसभरात 446 रुग्ण सापडले तर दोघा जणांचा मृत्यू झाला. रुग्णांपैकी 408 जणांना कोणतीही लक्षणे नव्हती तर 38 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. 5 जणांना ऑक्सिजन बेड देण्यात आला आहे. दिवसभरात 288 जण कोरोनामुक्त झाले तर सक्रीय रुग्णांची संख्या 2 हजार 3 91 वर पोहोचली आहे. दरम्यान, राज्यात दिवसभरात 2 हजार 24 रुग्ण सापडले असून 5 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 2 हजार 190 जण कोरोनामुक्त झाले तर सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 906 वर पोहोचली आहे.