बिहारमध्ये एकाच दिवशी उष्माघाताने 45 जणांचा मृत्यू

सामना ऑनलाईन। पाटणा

जून महिना सुरू झाला असला तरीही बिहारमध्ये उष्मा कायम असून उष्माघाताने य़ेथे एकाच दिवशी 45 जणांचा बळी घेतला आहे. तर 10 जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून उष्माघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयाची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. तसेच वाढत्या उष्म्याचा अंदाज घेत योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना नीतिश कुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शनिवारीच हिंदुस्थानच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बिहारमधील अनेक भागात उष्णतेने मर्यादा ओलांडली असून औरंगाबादमध्ये कमाल तापमान 45 वर पोहचले आहे. 18 जूनपर्यंत तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहेत

त्याचबरोबर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान, उष्माघाताने दहा जणांचा बळी गेला. दरम्यान, येथील शाळा 19 तारखेपर्य़ंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.