
सध्या ई-बेकर 45 वर्षे जूना कॉम्प्युटर विक्रीसाठी आला असून त्याची किंमत चक्क 11 कोटी रुपये ठेवली आहे.ऍपलचे दिवंगत को-फाऊंडर स्टीव्ह जॉब्स यांनी को-फाऊंडर स्टीव्ह कॉजनिएकच्या मदतीने हा कॉम्प्युटर 1976 साली तयार केला होता. महत्त्वाचे म्हणजे, हा कॉम्प्युटर खरेदी करण्यासाठी अनेकांनी तयारी दर्शवली आहे.
ई-बेच्या जाहिरातीनुसार,‘ही एक दुर्मिळ संधी आहे. कारण आता फक्त सहापेक्षा कमी ओरिजनल बाइट शॉप केओए वुड केसेज राहिले आहेत. त्यामधील बहुतेक केसेज संग्रहालयात आहेत. या केसेजमधील हा चांगल्या अवस्थेतील आहे. याला स्पेशल स्टोरेजमध्ये धूळ, ओलाव्यापासून सुरक्षित ठेवले आहे.’ लाँचवेळी या कॉम्प्युटरची किंमत 666.66 डॉलर म्हणजेच जवळपास 48600 रुपये इतकी होती.

























































