
देहरादून येथील भारतीय सैन्य अकादमी (आयएमए) मध्ये शनिवारी पासिंग आऊट परेडचे आयोजन करण्यात आले. या समारंभात अकादमीतून 451 अधिकारी पॅडेट्सने पदवी मिळवली आहे. यातील 419 तरुण अधिकारी लष्करात लेफ्टनंट म्हणून कार्यरत होतील. तसेच या वेळी नऊ मित्रराष्ट्रांतील 32 पॅडेट्ससुद्धा पास आऊट झाले. ही परेड ऐतिहासिक चेटवूड इमारतीच्या समोर ड्रिल स्क्वायरवर पार पडली. या वेळी श्रीलंकेचे लष्करप्रमुख जनरल लासांथा रोड्रिगो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर एअर डिफेडंन्स सेंटरचे कमांडेंट ब्रिगेडियर हेमंत सिंह यांनी परेडचे निरीक्षण केले. आयएमएचा गौरवशाली इतिहास राहिला असून येथून आतापर्यंत 66 हजारांहून अधिक पॅडेट्स सैन्य अधिकारी म्हणून बाहेर पडले आहेत.