
हिंदुस्थान चीन संघर्षाच्या पार्श्वभुमीवर हिंदुस्थानाने 59 चायनीज ऍप्सवरी बंदी घातली होती. आता केंद्र सरकारने पुन्हा 47 ऍप्सवर बंदी घातली होती. हे ऍप्स डेडा चोरी करत होते असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
केंद्र सरकारने पुन्हा ज्या 47 ऍप्सवर बंदी घातली आहे, ते ऍप्स बॅन केलेल्या ऍप्सने क्लोन ऍप्स होते. हे सर्व डेटा प्रोटोकॉलचे उल्लंघन कर होते. तसेच या ऍप्सच्या माध्यमातून डेटा चोरी केला जात होता. हे ऍप्स युजरची खासगी आणि गोपनीय माहिती चोरून त्यांचा वापर करत होते. त्यामुळे केंद्र सरकारने या ऍप्सवर बंदी घातली आहे.
59 ऍप्सवर घातली बंदी
या पूर्वी 29 जून रोजी केंद्र सरकारने 59 चायनीज ऍप्सवर बंदी घातली होती. त्यात टिकटॉक, हेलो, युसी ब्राऊजर, शेअर इट या ऍप्सचा समावेश आहे. महिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत या ऍप्सवर बंदी घालण्यात आली होती.























































