
चीनमधील कोरोना व्हायरसचा कहर सुरूच आहे. आतापर्यंत चीनमध्ये कोरोनामुळे 490 जणांनी आपला प्राण गमावला आहे. तसेच 24 हजारहून अधिक रुग्णही सापडले आहेत. मंगळवारी तब्बल 65 लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृत रुग्ण हे वुहान शहरातील होते. जगभरात कोरोना व्हायरस पसरत असताना जागतिक आरोग्य संघटनेने जगतिक आरोग्य आणिबाणी जाहीर केली आहे. तर अनेक देशांनी चीनकडे जाणारे आपली उड्डाणे रद्द केली आहेत.
कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये मृतांचा आकडा वाढत आहे. आतापर्यंत 490 जणांचा मृत्यू झाला असून रुग्णांची संख्या 24 हजार 324 वर पोहोचली आहे. चीनमधील हुबीए प्रांत हे कोरोना व्हायरसचे केंद्रबिंदू झाले आहे. एकूण रुग्णांपैकी 431 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. तसेच 262 रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे. एक लाख 85 हजार लोकांची तपासणी सुरू आहे.




























































