
मुंबई बँकेतर्फे आपल्या सभासदांना 5.10 टक्केप्रमाणे 5 कोटी 30 लाख रुपयांच्या लाभांशचे वाटप करण्यात आले. नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी लाभांशचे वाटप आठ दिवसांत करण्याचे जाहीर केले होते.
दरम्यान, मुंबई बँकेच्या ठेवीमध्ये तब्बल 500 कोटींनी भर पडली असून ठेवी 5689 कोटींवर पोहचल्या आहेत तर कर्ज व्यवहार 3000 कोटी रुपये आहे. बँकेचा सीआरएआर 9.64 टक्के इतका असून बँकेने यंदा 10.07 कोटी इतका नफा कमावला आहे. बँकेने स्वयं पुनर्विकास प्रकल्पांसाठी 1300 कोटी रुपयांचे कर्ज गृहनिर्माण संस्थांना मंजूर केल्याची माहिती बँकेचे कार्यकारी संचालक डी. एस. कदम यानी दिली.

























































