राज्यातील तब्बल 5 लाख 60 हजार पूरग्रस्तांचे स्थलांतर

331

राज्यातील पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या 5 लाख 60 हजार 953 पुरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यात प्रशासनाला यश आले आहे. शासनाचे आपत्ती नियंत्रण कक्ष, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर, नौदल, वायूदल, तटरक्षक दलाचे जवानांनी अहोरात्र मेहनत घेत या लोकांची पुरातून सुटका केली आणि सुरक्षित स्थळी हलवले. सगळ्यात जास्त नागरीक हे कोल्हापुरात स्थलांतरीत करण्यात आले आहे.

कोल्हापूरमध्ये 3 लाख 36 हजार 297 नागरिकांना तर सांगली येथील 1 लाख 74 हजार 485 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. नागरिकांना तात्पुरता निवारा म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात 210 तर सांगली जिल्ह्यात 168 तात्पुरता निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. तेथील लोकांना स्वच्छ पाणी, जेवणाची व्यवस्था, औषधोपचार उपलब्ध करून दिले जात आहेत.  कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील 61 हजार 27 जनावरांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

स्थानिक प्रशासनाबरोबरच सांगली आणि कोल्हापूर येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे 22, राज्य आपत्ती व्यवस्थापन दल 3,  तसेच नौदलाच्या 18, तटरक्षक दलाचे 8, आर्मी 17, उपलब्ध बोटी 163  अशी पथके कार्यरत आहेत.

बाधित गावे व कुटुंबे

  • कोल्हापूर जिल्ह्यात पूरबाधित गावे-321, बाधित कुटुंबे-81 हजार 88
  • सांगली जिल्ह्यातील पूरबाधित गावे-104 व कुटुंबसंख्या-34 हजार 917

इतर जिल्ह्यात बचाव केलेल्या व्यक्तींची संख्या 

  • सातारा-123 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-10755)
  • ठाणे- 25 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-13104)
  • पुणे- 108 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-13500)
  • नाशिक-05 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-3894)
  • पालघर-58 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-2000)
  • रत्नागिरी- 12 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-687)
  • रायगड-60 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-3000)
  • सिंधुदुर्ग-46 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-3231)

 

आपली प्रतिक्रिया द्या