जालना शहरात पाच लाखांचा गुटखा जप्त; तिघांविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना शहरातील तीन ठिकाणाहून 5 लाख रुपयांचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ जप्त करुन जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस अधिक्षक निलेश तांबे हे पथकासह गस्त करीत असताना मिळालेया माहितीच्या आधारे जुना जालना विभागातील कुरेशी मोहल्ला येथील आरोपी शेख बद्रोद्दीन शेख बशीरोद्दीन, दुःखीनगरातील शेख जावेद शेख रहीम, युसूफ कॉलनीतील इलीयास मोहम्मद जमालोद्दीन अन्सारी यांनी आपल्या घरात प्रतिबंधीत गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ ठेवले होते. मिळालेल्या माहितीवरुन या तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले.

शेख बद्रोद्दीन शेख बशीरोद्दीन याच्याकडून 2 लाख 35 हजार 950 रुपयांचा गुटखा तसेच शेख जावेद शेख रहीम याच्याकडून 1 लाख 43 हजार 500 रुपयांचा व इलीयास मोहम्मद जमालोद्दीन अन्सारी याच्याकडून 1 लाख 9 हजार 750 रुपये किंमतीचा गुटखा असा एकूण 4 लाख 89 हजार 200 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. अन्न सुरक्षा अधिकारी यांना पाचारण केल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा ताराचंद रोडे यांच्या तक्रारीवरुन तिघा आरोपींविरुध्द कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कार्यवाही पोलीस अधिक्षक एस.चैतन्य, अपर पोलीस अधिक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी भागवत गवळी, प्रदीप पवार, स्वप्नील साठेवाड, योगेश पठाडे, काकासाहेब बोटवे, महिला कर्मचारी कविता काकड, ज्योती राठोड, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपुत, कैलास कुरेवाड, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, विलास चेके आदींनी केली.