तीन दिवसांत चकमकीत पाच दहशतवाद्यांचा खात्मा

345
प्रतिकात्मक छायाचित्र

जम्मू व कश्मीरातील गांदरबल जिह्यात जवानांनी दहशतवादी चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तीन दिवसांतील या शोधमोहिमेत पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात हिंदुस्थानी जवानांना यश मिळाले आहे. सीमारेषेवर अनेक दहशतवाद्यांनी छोटय़ा-मोठय़ा कारवाया करत निष्पाप नागरिकांचा जीव घेण्याचे प्रकार सुरू केले आहे. सूत्राच्या माहितीच्या आधारे दहशतवादी लपल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर राष्ट्रीय रायफल्स, कश्मीरचे विशेष पोलीस दल व सीआरपीएफ यांनी संयुक्तिक शोधमोहीम सुरू केलेली आहे. या मोहिमेत शस्त्र्ासाठा व हत्यारे जप्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या