आचारसंहितेचा भंग; सोशल मीडियावरील 500 पोस्ट, जाहिराती डिलीट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी ट्विटर, व्हॉटस्ऍप आणि फेसबुक या सोशल मीडियावरील 500 पेक्षा जास्त खाती, जाहिराती आणि इतर आक्षेपार्ह मजकूर 10 आणि 11 एप्रिल या दोन दिवसांत काढून टाकण्यात आला अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली.

फेसबुकवरील 468 पोस्ट काढून टाकण्यात आल्या. मतदारांची दिशाभूल करणारी माहिती त्यामध्ये दिली गेली होती. त्यातील एक पोस्ट कर्नाटक, आसाममधील दोन तर इतर या तेलंगणामधील होत्या. तेलंगणामध्ये निवडणुकीसंदर्भातील 32 जाहिराती काढून टाकण्यात आल्या. सात जाहिराती आणि दोन आक्षेपार्ह पोस्टबाबत अद्याप निर्णय घ्यायचा आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली.

39 ट्विटर खात्यांवर कारवाई

ट्विटरवरील दोन खाती काढून टाकण्यात आली असून आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या इतर 39 खात्यांवर कारवाई केली जात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या नावाचे बोगस खाते सोशल मीडियावर आढळून आले ते काढून टाकले गेले. 39 ट्विट हे आचारसंहितेचा भंग करणारे होते. समाजात जातीय तेढ निर्माण करण्यास प्रोत्साहन देणारे मणिपूरमधील एक व्हॉटस्ऍप खाते काढून टाकले गेले, अशीही माहिती आयोगाने दिली.