संभाजीनगरात आज कोरोनाचे 5 बळी, मृतांची संख्या 55 वर

575

संभाजीनगर शहरात  गेल्या 24 तासात 5 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील एकूण मृतांचा आकडा 55 वर गेला आहे.

संभाजीनगर शहरातील चार आणि सिल्लोड येथील एक अशा एकूण 5 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे घाटी प्रशासनाने सांगितले. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये बेगमपुरा, गांधी नगर, हिमायत नगर, रेंगटीपुरा, मकसूद कॉलनी, बारी कॉलनी, रेहमानिया कॉलनी, वैजापूर, अन्वा-भोकरदन या भागातील रुग्णांचा समावेश आहे.

पाच मृत रुग्णांमध्ये एक पुरुष आणि चार महिला रुग्णांचा समावेश आहे. घाटीत आतापर्यंत 50 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. सध्या घाटी रुग्णालयात 70 कोरोनबाधितांवर उपचार सुरू  असून, घाटी रुग्णालयात 11 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार झाल्याने ते आज कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याचेही प्रशासनाने कळवले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या