Accident : आंध्र प्रदेशात भीषण अपघात, बस आणि ट्रकच्या धडकेत सहा लोकांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशच्या पलनाडू जिल्ह्यात मंगळवारी रात्री बस आणि ट्रक ची जबरदस्त धडक झाली. या धडकेत सहा लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघातात 32 लोक जखमी झाले असून गुंटूर येथे नेण्यात आले आहे. चिलकलुरिपेटा ग्रामीण पोलीस या अपघाताची चौकशी केली जात आहे.

या घटनेची पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिन्नागंजम येथून हैदराबाद येथे जाणारी बस चिलकलुरिपेटामध्ये एका ट्रकवर जोरदार धडकलीय. जबरदस्त धडक बसल्याने ट्रक आणि बसला आग लागली, ज्यात 6 लोकांचा होरपळून मृत्यू झाला. तर जखमींना गुंटूर येथे नेण्यात आले आहे, मृत बापटला जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या घटनेचा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला असून त्यात बस पूर्णपणे जळून राख झाल्याचे दिसत आहे.