जम्मू कश्मीरमध्ये चकमकीत जैशच्या सहा दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरमधील अनंतनाग व कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. हे सर्व दहशतवादी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे आहेत. या चकमकीत एक जवान शहीद झाला असून आणखी दोन जवान जखमी झाले आहेत.

कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले असून त्यातील एक जण पाकिस्तानी दहशतवादी आहे तर दोन स्थानिक दहशतवादी आहे. या चकमकीत मालमत्तेचे कोणतेही नुकसान झालेले नाही. दरम्यान अनंतनागमध्ये जालेल्या चकमकीत रात्री एका दहशतवाद्याचा खात्मा झाला तर पहाटे दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. जम्मू कश्मीरचे पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी ही माहिती दिली.