
उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरपुरमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पायी घरी निघालेल्या 6 मजुरांचा मृत्यू झाला आहे. लॉकडाऊनमध्ये मजुरांचे सर्वाधिक हाल होत आहे.
कोरोनाचे संकट पाहता देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक मजुर परराज्यात अडकले आहेत. वाहनांची व्यवस्था नसल्याने अनेक मजूर पायीच आपल्या स्वगृही निघाले आहेत. संभाजीनगरमध्ये रेल्वे रुळांवर झोपलेल्या मजुरांचा 16 ट्रेन अपघातात मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये मजुरांना एका खासगी बसने उडवले आहे. त्यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. पंजाबमधून हे मजूर आपल्या गावी बिहारमध्ये जात होते. हातात पुरी भाजी घेऊन हे चालले असताना एका बसने त्यांना उडवले. बुधवारी रात्री 11.45 च्या सुमारास हा अपघात झाला. या प्रकरणी आरोपी बस चालकाला अटक करण्यात आली आहे. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत केली आहे.




























































